मावळ जनसंवाद :-
मावळ तालुका युवक एकता मंच सामाजिक संघटनेच्या वतीने नचिकेत बाल ग्राम येथील वसतीगृहात एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले .
नचिकेत बाल ग्राम येथे गरिब,उपेक्षित,होतकरू लोंकाची मुल शिक्षण घेत असतात.लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे एक महिनाभर पुरेल इतका अन्न धान्यसाठा, जीवनावश्यक वस्तु देण्यात आल्या.
मावळ तालुका युवक एकता मंच सामाजिक, शैक्षाणिक, पर्यावरण, शेती पुरक यासंबधी विविध उपक्रम मावळ तालुक्यात गेले चौदा वर्ष अविरतपणे राबवत असतात.
याप्रसंगी मावळ तालुका युवक एकता मंच सामाजिक संघटनेचे विलास गायकवाड,संपत शेटे, कुणाल ओव्हाळ,अनिल सातकर,आबाजी शेळके, सचिन भांडे, गणेश साबळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रताप गुंजाळ, उदयोजक संदीप लालगुडे, नचिकेत बालग्रामचे व्यवस्थापक अमोल कदम व विद्यार्थी उपस्थित होते.
छायाचित्र :- मावळ तालुका युवक एकता मंच सामाजिक संघटनेच्या वतीने नचिकेत बाल ग्राम येथील वसतीगृहात एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वाटप करताना ठिपलेला फोटो
0 Comments