Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

पार्थ अजितदादा पवार स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी ..!


मावळ जनसंवाद :-  
                 कोविड 19 कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना शहरी व ग्रामीण भागातील विविध संस्था, संघटना,सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.याचाच भाग म्हणून नायगाव येथील पार्थ अजितदादा पवार स्पोर्ट फाउंडेशन च्या वतीने नवनाथ चोपडे, सुनील लालगुडे,महेश चौधरी योगेश देसाई व स्वप्नील फाटक,अमोल येवले, गणेश चिखले, गणेश जाधव यांच्या पुढाकाराने नायगाव व येवलेवाडी येथे विशिष्ट रसायन वापरून कीटकनाशक फवारणी करण्यात आली.
        यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. कृपया शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना पाळा.सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे टाळा, स्वच्छता राखा, आपले हात सतत स्वच्छ ठेवा, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. ताप असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर डॉक्टरांना भेटा असे आवाहन सुध्दा करण्यात आले.
       यावेळी फवारणी करत असताना ट्रॅक्टर व इतर साधन समुग्रीसाठी नवनाथ गावडे,वाघू चोपडे व कांताराम येवले, सोपान येवले यांचे सहकार्य लाभले


  छायाचित्र :   पार्थ अजितदादा पवार स्पोर्ट फाउंडेशन च्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  फवारणी करताना  ठिपलेला फोटो 





Post a Comment

0 Comments