Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

ग्रामीण भागत लॉकडाऊनची 'एैसी की तैसी' ..!


मावळ जनसंवाद :-  
              कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचे व शासकीय नियमांचे पालन शहरी भागात होताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागातील जनता सर्रास मोकाटपणे  वावरताना दिसत आहे. आंदर व नाणे मावळातील तरुणवर्ग या आपत्तीकाळात वनभोजन पार्ट्या, डोंगर माथ्यावरील देवदर्शन, भटकंती, नदी व धरणात पोहणे, क्रिकेट खेळणे, बैलगाडे पळवणे तर काही युवक गावमंदीरात व इतर ठिकाणी पत्ते खेळून वेळ घालवत आहे. तर काही तरुण गावात व डोंगरावरील देवस्थानाच्या ठिकाणी साफसफाई करुन समाज हिताची कामे करुन वेळ घालवत आहे. 
       नाणे व आंदर मावळात शेतकरीवर्ग आपापला बराचसा वेळ शेतीची मशागत करुन घालवत आहेत. मोकाटपणे डोंगर दर्यात वावरणार्या तरुणांकडून जंगलात पार्ट्या करुन जंगलास वणवा लावले जात आहे. त्यामुळे पशू, पक्ष्यांस हानी पोहचत आहे. तसेच आंदर व नाणे मावळ भागतील बरेचशे तरुण घराबाहेर पडून जिवनाश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली टाकवे बुद्रुक व कामशेत येथे काय चाललंय? हे पाहण्यासाठी टाकवे बुद्रुक व कामशेत येथे गर्दी करत आहे. या आपत्तीकाळात ग्रामीण भागातील तरुण काळजी न घेता लाॅकडाऊन चे उल्लंघन करुन  दिवस मजेत घालवताना दिसत आहे. मग लॉकडाऊन फक्त शहरी भागातच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासनाकडून अशा या विनाकारण मोकाटपणे वावरणार्या तरुणांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.


  छायाचित्र :-  शिंदेवाडी : संचारबंदी असतानाही शिंदेवाडी शेजारील डॅमवर तरुणांनी पोहण्यासाठी 
                       केलेली गर्दी.

Post a Comment

0 Comments