मावळ जनसंवाद :-
मावळातील वनक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक व अनैसर्गिक पद्धतीने वणवे लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मावळातील जैवविविधता जळून खाक होत असून मावळातील जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. नैसर्गीक पद्धतीत उन्हाळ्यातील उष्णतेने झाडांच्या कोरड्या पानांचे घर्षण होऊन आग लागते तर अनैसर्गिक पद्धतीत जंगलात फिरणारे गुराखी व इतर लोक विडी, सिगारेट पिऊन न विझवता फेकून देत असल्याने जंगलास आग लाग लागून वणवे पेटत आहे. सध्या मोहाच्या फुलांना बहर येणाच्या काळ आहे. दारु बनवण्यासाठी मोहाची फुले जमा करण्यासाठी येणारे आदीवासीही मोहाची फुले जमा करताना अडचण येऊ नये म्हणून झाडाखालची वाळलेली पाने पेटवून देत आहे. गवत पेटवल्याने पावसाळ्यात नव्याने चांगले गवत येईल या उद्देशाने गुराखी सुद्धा गवत पेटवून देत आहे. त्यामुळे वणवे लागून जैवविविधतेचे नुकसान होत असून हे लागणारे वणवे रोखण्यास वनविभागाने काहीतरी उपाययोजना करायला हव्यात. वनविभागाने वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना केल्या तर लागणारे वणवे बर्यापैकी रोखले जातील.
गेल्या एक महीन्यापुर्वी आंदर मावळातील दवणेवाडी व घोणशेत शेजारील डोंगरावर मोठा वणवा लागला होता. त्यामुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मावळ भागात जर अनैसर्गिक पद्धतीने वणवे लावत असेल तर त्या व्यक्तींवर वनविभागाने कारवाई करायली हवी जेणेकरुन मावळातील जैवविविधतेचे संरक्षण व जतन करता येईल.
0 Comments