मावळ जनसंवाद :-
पुणे शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार माननीय दत्तात्रय सावंत यांनी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती मावळच्या वतीने मावळ तालुक्यातील विनानुदानित शाळा व विनानुदानित वर्ग तुकड्या मधील शिक्षकांना किरणा धान्यव वस्तूचे वाटप भरघोस वाटप करून लॉकडाऊनच्या काळात डबघाईला आलेल्या विना अनुदानित शिक्षकांना खूप मोठा आधार दिला.
वास्तविक पाहता गेली पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात विना अनुदानित शिक्षकांना मदत मिळावी. म्हणून इमेल द्वारे निवेदन देऊन तशी मागणीही केली.परंतु अद्यापही या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केलेले दिसत आहे.
तुटपुंज्या पगारावर काम करणारा विना अनुदानित शिक्षक सध्याच्या लॉकडाऊन काळातच्या काळात कसे दिवस काढत असेल ? हा खरा चिंतेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर आमदार दत्तात्रय सावंत यांनी स्वतः निर्णय घेऊन महाराष्ट राज्य शाळा कृती समिती मावळ शाखेच्या वतीने मावळ तालुक्यातील विनानुदानित शिक्षकांना केलेली किराणा धान्य व वस्तूची मदत हि त्यांच्या कौतुकाचा विषय बनली आहे. मावळ तालुका महाराष्ट राज्य शाळा कृती समितचे अध्यक्ष श्री. शंकर धावणे यांच्या हस्ते या किट्सचे वाटप करण्यात आले.मदत स्विकारलेल्या सर्व शिक्षकांनी आमदार दत्तात्रय सावंत याचे फोनवरून व अप्रत्यक्ष मनापासून आभार मानले.

0 Comments