Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

शाळा कृती समितीच्या वतीने विनाअनुदानित शिक्षकांना धान्य वाटप..!

मावळ जनसंवाद :-  
                 मावळ तालुक्यातील अध्याप पगार सुरु नसलेल्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून वाटप करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष शंकर धावणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शाळा समितीच्या प्रमुख पदाशिका-यांशी व्हिडीओ कोंन्फरन्सद्वारे आमदार दत्तात्रय सावंत यांनी १३ एप्रिल रोजी संवाद साधला. लॉकडाऊन वाढल्याने ज्या शिक्षकांना शासनाचा पगार मिळत नाही, तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.अशा शिक्षकांना लॉकडाऊन उठेपर्यंत पुरेल एवढा किरण माल घरपोच करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार मावळ तालुक्यातील कृती समितीच्या पदाधिकार्यांनी समाजसेवी संस्थाची मदत घेतली. काही प्रमाणात स्वतः खर्च करत महिनाभर पुरेल एवढे अंदाजे १७०० रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तूंचे कीट बनवून शिक्षकांना घरोघर जाऊन वाटप केले. 

Post a Comment

0 Comments