मावळ जनसंवाद :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदर मावळातील नागरिकांनी शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे, या उद्देशाने सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतील युवकांकडून रस्त्यावर कोरोना विषयी विविध संदेश लिहून जनजागृती केली जात आहे.सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आंदर मावळातील भोईरे, वडेश्वर, फळणे फाटा याठिकाणी 'ठेवा स्वछता राखा अंतर, कोरोना राहील दूर निरंतर,डॉक्टर, प्रशासकिय यंत्रणा, पोलीस यांना सहकार्य करा, घरात थांबु या, कोरोनाला हरवूया', नागरिकांनी घ्या जबाबदारी, राहा घरी' असे संदेश रस्त्यावर लिहून जनजागृती करण्यात आली आहे. आंदर मावळातील विविध गावचे रस्ते एकत्र जोडले जातात अशा मुख्य ठिकाणी या मोहिमेअंतर्गत संदेश लिहले जात आहेत. सेवा फाउंडेशन च्या उपक्रमामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालक व पादचाऱ्यांमध्ये जनजागृती होत आहे.
अशाच प्रकारे मावळातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या कामशेत शहरात तसेच टाकवे, कान्हे, याठिकाणी कोरोना विषयी जनजागृती संदेश लिहणार असल्याचे सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कडून सांगण्यात आले आहे. यावेळी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या डॉक्टर व पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, असे सेवा फाउंडेशन कडून सांगण्यात आले. तसेच नागरिकांनी मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करा, विनाकारण घराबाहेर पडून नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0 Comments