Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

अभिमानास्पद ! मावळची कन्या कु.खुशी पडवकर यांसकडून शासनास एक हात मदतीचा..!

मावळ जनसंवाद :-  
                   
 कु.खुशी संजय पडवकर ( कामशेत मावळ )

कोरोनामुळे संकटात अडकलेल्या नागरिकांना मदत करता यावी, यासाठी शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत जशी जमेल तशी मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब नागरिकांना केले आहे. 
   कु.खुशी संजय पडवकर या सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात इ.१० वीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबदल शाळा जैन इंग्लिश स्कुल कामशेत यांचे कडून रोख रूपात मिळालेली बक्षिसाची १५०० रुपये रक्कम न खर्च करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्त केली आहे. 
        कोरोना रोगाचा पादुर्भावाने लॉकडाऊनमुळे देशातील नागरिकांना देखील मदत करण्याचे आव्हान सरकार पुढे आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जमेल तशी मदत करावी असे आवाहन केले. त्या आवाहनानुसारआम्ही समाजाचे काहीतरी देणे लागत असतो, या भावनेने फुल ना फुलाची पाकळी तसेच  शासनास एक हात मदतीचा म्हणून खारीचा वाटा स्वय स्फूर्तीने मदत केला आहे. त्यामुळे पंचकृषित सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
         प्रतिक्रिया:- देश संकटात असताना आपण आपला महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्यासाठी आपल्या होत असल्या कार्यास व कर्तुत्वास सलाम, महाराष्ट्र राज्य लवकरच कोरोनामुक्त होवो. हि ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद, जय महाराष्ट्र.अशी भावनिक हाक कु.खुशी संजय पडवकर यांनी मावळ जनसंवादला दिली आहे. 









Post a Comment

0 Comments