मावळ जनसंवाद :-
सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने डोंगरावरील जळीत पट्टे काढण्यासाठी वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील परिसरात आता उन्हाळ्याच्या दिवसात नैसर्गिक आणि अनैसर्गिक पद्धतीने वणवा लागत असतो व झाडे जळतात. पर्यावरण आणि प्राण्यांच्याही जीवाची मोठी हानी होते. जर डोंगराळ भागातील या जळीत पट्टया काढल्या तर होणारी हानी ही टाळली जाऊ शकते. असे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे चेतन वाघमारे, किरण ढोरे, सागर गवारे,समीर काठे, निलेश गोडे आणि सदस्य उपस्थित होते.
0 Comments