मावळ जनसंवाद :-
स्पर्धेच्या युगात नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी स्वतःमध्ये विविध कौशल्यांचा परिणामकारक वापर युवकांनी करणे आवश्यक आहे,ग्रामीण भागातील मुलांनी कौशल्य विकासातून स्वतःच्या जिवणात परिवर्तन करावे,असे मत एसीजी कंपनीचे प्लांट हेड केनिथ ब्रिगेंझा यांनी एसीजी केअर्स फौडेशन व मिटकाॅन आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रंसगी तळेगाव,ता मावळ,जि पुणे येथे व्यक्त केले.

यावेळी कंपनीचे मनुष्यबळ विकास प्रमुख दिपक पाटील,मिटकाॅनचे वरिष्ठ उपाध्यक्ष चंद्रशेखर भोसले,एसीजी केअर्स फौडेशनचे व्यवस्थापक चंद्रशेखर वाळके, मिटकाॅनचे मुख्य व्यवस्थापक गणेश खामगळ,एच आर विभागाच्या सोनाली घारे,युनिक एज्युकेशन फौडेशनच्या प्रमुख सुरेखा माने,केतन पाटील, धनाजी मोरे, राहूल सुर्यवंशी, देविदास आडकर इत्यादी उपस्थित होते.
एसीजी केअर्स फौडेशन व मिटकाॅन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील तरूण-तरुणींसाठी कौशल्य विकासातील विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ४५० युवकांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले असून त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करण्यात येते. कार्यक्रमाप्रसंगी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेल्या युवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
मिटकाॅनचे वरिष्ठ उपाध्यक्ष चंद्रशेखर भोसले व कंपनीचे मनुष्यबळ विकास प्रमुख दिपक पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले व विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केल्या बद्दल मुलांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर वाळके यांनी केले तर आभार गणेश खामगळ यांनी व्यक्त केले
0 Comments