Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

अभिमानास्पद ! मावळची कन्या कु.चेतना घोजगे हिने पटकाविले रौप्यपदक...!

मावळ जनसंवाद :- 
                           भुवनेश्वर (ओरिसा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युनिव्हसिटी गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये दुबेज गुरुकुल वडगाव मावळच्या दोन खेळाडूंनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे. तळेगाव दाभाडे येथील चेतना विजय घोजगे हिने मुलीच्या ४९ किलो वजनी गटात ६५ किलो स्नच व ८३ किलो  क्लिन जर्क असे मिळून १४८ किलो वजन चलून रौप्य पदावर आपले नाव कोरले. तसेच मुलांच्या ६७ वजनी गटात १२३ किलो स्नच व महेश असवले याने १४३ क्लिन जर्क मिळून २४६ किलो वजन उचलून सुवर्ण पदक प्राप्त केले. दोन्ही खेळाडू वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुल येथे बिहारीलाल दुबे व आनंद जांभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. उत्तुंग यशाबद्दल या दोन्ही खेळाडूंचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.         


                छायाचित्र :-  चेतना दिपक घोजगे यांनी रौप्य पदक परिधान केलेला फोटो  

Post a Comment

0 Comments