Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नाणे विद्यालयात क्रीडा पारितोषिक व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न..!


          मावळ जनसंवाद :-  
                     नाणे माध्यमिक विद्यालय नाणे, येथे इयत्ता दहावीच्या निरोप समारंभ, वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन या तीन संयुक्त कार्यक्रमांचे नियोजन विद्यालयात करण्यात आले होते.
        त्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मावळ तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, कामशेत पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे, पोलीस पाटील दत्तात्रय वाल्हेकर, युवा नेते कैलास गायकवाड, दत्तात्रय आंद्रे, स्वाभिमानी रिपब्लिकनचे नाणे मावळचे अध्यक्ष व युवा उद्योजक अमित वंजारी, सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध फोटोग्राफर किशोर दिवेकर, माजी सरपंच सिकंदर मुलाणी, रघुनाथ आंद्रे, ह.भ.प. बाबाजी महाराज काटकर, गेनू इंगवले व मुख्याध्यापक स्वप्नील नागणे सर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
       त्यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. प्रथम दहावीच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यांनतर प्रमुख पाहुण्यांचा स्वागत समारंभ पार पडला. त्यानंतर वार्षिक क्रीडा सप्ताहातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
        प्रसंगी काही विशेष सन्मान करण्यात आले. विद्यालयाचा गुणवान आणि कर्तृत्ववान माजी विद्यार्थी तुषार शेडगे याने राज्यस्तरापर्यंत कबड्डी स्पर्धेत झेप घेतलेली आहे. त्यामुळे त्याला युवा खेळाडू पुरस्कार देण्यात आला. शिवलीच्या छत्रपती विद्यालयाचे कलाशिक्षक अतिष थोरात यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला. तर अमोल कुचेकर यांनी गरिबीतून संघर्ष करून रेल्वे इंजिन चालक पदावर झेप घेतली त्यामुळे त्यांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
           यावेळी नाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जिल्हयात विजेत्या ठरलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एक लोकनृत्य सादर केले. त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका कवाष्टे मॅडम व ज्योती माळी मॅडम उपस्थित होत्या.
        प्रसंगी जवळपास पन्नास विजेत्यांना सन्मानचिन्ह सन्मानित करण्यात आले. या परितोषिकांचा संपूर्ण खर्च मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी युवा नेते अमित वंजारी व सामाजिक कार्यकर्ते किशोर दिवेकर यांनी केला.
           त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुण दर्शन कार्यक्रम सादर केला. त्याला उपस्थित महिला भगिनी व पुरुष मंडळींनी खूप दाद दिली. कार्यक्रमाच्या सरते शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. अशाप्रकारे संपुर्ण कार्यक्रम अगदी शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न झाला. 
             त्यावेळी मुख्याध्यापक नागरगोजे सर शिक्षक गोल्हार सर, पोपट पारसे, दिनेश पावरा, शेखर आंग्रे, प्रसिद्ध फोटोग्राफर प्रदीप आंद्रे, विशाल साठे, आकाश शिंदे, अमोल ठाकर, नकुल सुतार, सुशील भोते, विशाल तामकर यांच्यासह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार सोमनाथ गोडसे यांनी मानले.



           छायाचित्र :   नाणे माध्यमिक विद्यालय नाणे, येथे इयत्ता दहावीच्या निरोप समारंभ, वार्षिक 
               क्रीडा पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन ठिपलेला फोटो 



Post a Comment

0 Comments