मावळ जनसंवाद :-
संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर मध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधुन विज्ञानप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उदघाटन अध्यक्ष विजय कालेकर सचिव लक्ष्मण भालेराव,उपाध्यक्ष पोपट कालेकर ,संचालक डॉ संजय चौधरी,खजिनदार अरिफ तांबोळी अॅड भरत ठाकर प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकर सरपंच खंडु कालेकर,विद्या गांधी यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी विद्यार्थ्यांनी एकाचढ एक विज्ञान प्रयोग सादर केले. यामध्ये हायड्रॉलिक क्रेन, रोबोटिक आर्म, हायड्रॉलिक डंपर, सौरऊर्जा वापर, विजनिमिर्ती, चंद्रयान, मंगलयान, औषधी वनस्पती, केमीकल इंडीकेटर, वेपन ट्रेंनिंग, वायरलेस डाटा, सोलर कुकर, भुकंप गजर वनस्पती व प्राणी यांच्या सेलची माहिती अशा विविध प्रकारचे प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले होते. यावेळी उत्तम चव्हाण, शामराव कडु, गोरक्ष जांभुळकर, भरत पाठारे, संजय मोहोळ, शैला कालेकर, सुवर्णा राऊत यांच्या सोबत पालक देखील बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे व प्रकल्प प्रमुख श्वेता कालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निता कालेकर, सोनल गांधी, बाळु कदम, कैलास येवले, आकाश भालेराव, दिनेश परंचड, संध्या शिंदे, ऐश्वर्या बुटाला, काजल कालेकर यांनी विशेष प्रयत्न केले .
0 Comments