Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

डोंगर पोखरल्यामूळे व वृक्ष तोडमुळे वन्य प्राणी झाले बेघर..!

मावळ जनसंवाद :-  .

            मावळ तालुका हा सह्याद्रीच्या रंगानी भरला आहे. पैशाच्या हवासा पोटी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरले जात असल्यामूळे तसेच वृक्ष तोडमुळे वन्यजीव, वन्य प्राणी जंगलामध्ये राहण्यासाठी सुरक्षाचे प्रमाण कमी होत चालले आहे.  मावळ  तालुक्यातील  काही गावाना डोंगर लाभले आहे.  शिवाय नाणे मावळात सह्याद्रि पर्वताची  रांग असुन नाणे मावळात डोंगर,दर्या,ंंनदी , पर्वत हे निसर्गाचे देने मोठ्या प्रमाणात लाभले आहे. 
     डोंगर उंच असुनही झाडे दाट आहेत.या झाडा मध्ये वन्यजीव, वन्यप्राणि त्यामध्ये ससा,कोल्हा  माकड,वानर, वाघ,डुक्कर, बिबट्या,मोहर अदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात डोंगरातील व्रक्ष् तोड व डोंगर पोखरल्यामुळे बेघर झाले असुन ते मानवी वस्ती कडे धाव घेत आहे.
           काही वन्य प्राणी त्यामध्ये डुक्कर व वाघ  हे शेतकरी बांधवांच्या शेता मधील ऊस ह्या पिका मध्ये राहत आहे. शिवाय हे  वन्य प्राणी पिकांचे नुकसान करित आहे. 
              पिकामध्ये राहत असल्यामूळे शेतकरी बांधवांना रात्रीच्या वेळत पिकाना पाणी देने जोखमिचे झाले आहे. शिवाय वाघ,डुक्कर, बिबट्याच्या वावरामुळे  मावळातील  शेतकरी भयभीत झाले आहे. 
               प्रशासनाने लवकरात लवकर उपाय योजना करावी जेणे करुन वन्य प्राणी पासुन शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही अशी मागणी नागरिक करित आहे. तसेच वन्यजीव,वन्य प्राणी बेघर होऊ नये म्हणून वुक्ष लागवड केली पाहिजे असी मागणी कोंडीवडे गावचे प्रगतशील शेतकरी विष्णू किसन गायकवाड यांनी मावळ जनसंवादला दिली आहे. 

Post a Comment

0 Comments