Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

कचरा उचलनाऱ्या कामगारांच्या आरोग्याची हेळसांड..!

मावळ जनसंवाद :-  
            
       मावळ तालुक्यात  ओला / सुका  कचरा उचलण्यासाठी कामगारांना आरोग्याची हेळसांड मोठया प्रमाणात होते. कचरा कुंडी मध्ये जाऊन कचरा भरला जातो. त्या कचऱ्याची मोठया प्रमाणात दुर्घन्धी पसरली जाते तेथे जाऊन ह्या व्यक्तींना  काम करावे लागते. जी व्यक्ती कचरा भरण्यासाठी जाते. त्या व्यक्तीकडे हातमोजे , मास्क , गणबुटे सुद्या नसतात. तरी देखील पोटाची खळगी भरण्यासाठी हे काम करावे लागते. ह्या कामाच्या बदल जे पैसे मिळेल त्या पैशातून आपल्या कुठूबाच्या उदरनिर्वाह  केला जातो. 


              काही ठिकाणी कामगार घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो. कचरा गोळा  करण्यासाठी सुमारे पाच ते सहा तास कचऱ्यातच  त्यांना घालवावे लागतात. त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी  मास्क, घनबूत . हातमुजे ग्रामपंचायतीने /प्रशाशनाने देण्यात यावे. परंतु काही कामगारांकडे मास्क,घनबूत हातमोजे फाटलेल्या  अवष्ठेत  आहे. त्यामुळे  कामगारांना  त्वचारोग,शोषणाचे  तसेच  फुफसला  संसर्ग अशा गंभीर आजारांना  सोमोरे जावे लागत आहे. तसेच कामगारांना औषधे, कीटक नाशके, असिड अशा  घातक  पदार्थाचा  देखील समावेश असतो अशा कचऱ्याचे विलगीकरण करताना शरीराला स्पर्श  होऊन अपाय होऊ शकतो. शिवाय स्वछता अभावी त्वचारोग होण्यासाठी दाट शक्यता असते. ब्लब, बाटल्याच्या काचयामुळे देखील हात  व पायाला गँभीर इजा  होते.  
           त्या साठी कचरा उचलणाऱ्या कामगारांना  योग्यते उपाय योजना करणे गरजेचे आहे. नियमानुसार कचरा वेचक कामगारांच्या आरोग्य तपासणी करणे अनिवार्य  असते. तसेच कामगारांना आरोग्य अल्पशिक्षित असल्याने कचरा उचलण्याचे काम करावे लागते. मुलांनी शिकून  मोठे  व्हावे  आपल्या  पाठीमागच्या  अठरा  विश्व्  दारिद्र्य  हटावे. यासाठी  आम्ही  कचरा  उचलण्याचे  काम करीत असतो. आमच्या जीवनाची पर्वा  न करता  भेटेल ते काम करीत आहे अशी प्रतिक्रिया कामगार देत आहे. 







Post a Comment

0 Comments