मावळ जनसंवाद :-
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या 'जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार' सोहळा सासवड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष के.एस.ढोमसे यांनी केले.शिक्षणाधिकारी डॉ.गणपत मोरे यांनी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याचे आवाहन शिक्षकांना केले. मावळ तालुक्यातील गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालय करंजगाव येथील दिनेश शिवाजीराव टाकवे,
आदर्श विद्यामंदिर तळेगाव प्रकाश विठ्ठलराव शिंदे , सुरेश हनुमंत सुतार सोमाटणे,मुकुंद किसन ढोरे कामशेत,लक्ष्मीकांत मारुती शिंदे साळुंब्रे, श्रीमती वैशाली गोविंद माळी नवलाख उंबरे ,यांना जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरंदरचे आमदार संजय जगताप,जिल्हा शिक्षणाधिकारी गणपत मोरे,जिल्हा बँकेचे मा.अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, पुरंदरच्या सभापती सौ.नलिनी लोळे,सनदी अधिकारी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष जी.के.थोरात आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी झेंडे, सेकंडरी स्कुल एम्प्लॉईजचे अध्यक्ष जी.आर.पाटील, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा स्नेहलता बाळसराफ, मावळचे अध्यक्ष अशोक धानोरकर,अनिल सातकर,संजय टाकवे,अशोक वाडेकर आदी शिक्षक उपस्थित होते.
छायाचित्र :- सासवड - शिक्षकांचा सन्मान करताना मान्यवर येथे ठिपलेला फोटो
0 Comments