Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

मावळ तालुक्यात " हर हर महादेव " चा गजर...!

मावळ जनसंवाद :-  
                                   
                   महाशिवरात्री निमित मावळ तालुक्यात " हर हर महादेव " चा गजर होत आहे. निसर्गाचे मोठे देणे लाभलेल्या मावळ तालुक्यात प्रत्येक गावात शिवमंदिर आहे.  शेलारवाडी येथील श्री क्षेत्र घोरवडेश्वर, कामशेत येथील  कंठेश्वर  शिवमंदिर, वडिवळे गावातील तीन नद्यांच्या संगमावर असलेले संगमेश्वर मंदिर, चिखलसे खिंडीतील केदारनाथ शिवमंदिर, संगिसे येथील कांबेश्वर शिव मंदिर व श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर  हे प्राचीन शिवमंदिर आदि मंदिरात सकाळ पासूनच भाविकांची अलोट गर्दी केली होती.




       मावळ तालुक्यातील सर्वच मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या लांबच लांब लागल्या होत्या. मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. 
             शिव मंदिरात सकाळ पासूनच  विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पहाटे होमहवन, अभिषेक, महापूजा,आरती झाल्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. काही दिवस आधीच ठिकठिकाणी मंदिराभोवते रंग रंगोटी करून सजवण्यात आले होते. 
              संगमेश्वर मंदिर :-   नाणे मावळातील सर्वात मोठी अशी महाशिवरात्र ही  मुंबई- पुणे हायवे लगत 
तसेच कामशेत  शहरापासून अवघे काही अंतरावर असलेले संगमेश्वर मंदिर (शंकराचे मंदिर) नदीच्या काठावर बसले असून, त्या ठिकाणी  कुढा, पुंडलिका व इंद्रायणी या तिन्ही नद्यांचा संगम होतो. संगमेश्वर मंदिर हे का जागृत देवस्थान असून श्रावण महिन्यातील सोमवारी शिवलिंग व नागदेवतेच्या दर्शनासाठी,तसेच महाशिवरात्रीला भक्तांची खूप गर्दी असते. विशेषत: मंदिरात महाशिवरात्रीला नागदेवता भक्तांना दिसते. शिवाय मंदिरासमोर तुळशी  वृदावन तसेच नंदी आहे. 
          महाशिवरात्रीमुळे संगमेश्वर मंदिर व आजू बाजूचा परिसर हा भक्तीमय झाला होता. शिवाय  यात्रा असल्याने लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे, झोके व इतर करमणुकीची खेळणी होती. लहान मुलासाठीची खेळण्याची दुकाने, रसाची दुकाने व इतर अनेक प्रकारचे व्यावसायिकानी दुकाने सजवली होती. दर्शन घेतल्यानतर नागरिक व विशेष करून लहान मुले झोके व पाळण्यात बसण्याचा आनद  लुटत होते. सायंकाळी उशिरा पर्यंत मंदिरात दर्शनासाठी भाविक येत होते. शिवाय  या यात्रेमध्ये  कोणताच  अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून कामशेत पोलीस ठाणे व पोलीस पाटील यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  
              विशेषता म्हणजे वडिवळे गावची गाव यात्रा ही महाशिवरात्रीला असल्याने येथे नागरिक गर्दी करतात. रात्रीच्या वेळी भारुडाचा कार्यक्रम व दुस-या दिवशी दुपारच्या सुमारास  संगमेश्वर मंदिराच्या  प्ररागणामध्ये दर साल कुस्त्यांच्या आखाड्याचा कार्यक्रम आयोजन करतात. ह्या आखाड्याला मोठ्या प्रमाणात पैलवान हजेरी लावतात. 
                कोंडेश्वर मंदिर :-   श्री. क्षेत्र कोंडेश्वर  हे प्राचीन शिव मंदिर नाणे मावळातील जांभवली  या  निसर्ग रम्य गावी असून मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचे तीन मोठे कुंड व ढाकभिरीचा अवघड सुळका आहे. छत्रपती  शिवाजी महाराज प्रवासात  असताना  या ठिकाणी  विश्रांती घेत असे इतिहास अभ्यासक सांगतात. याच वैशिष्ठ्यामुळे नाणे मावळातील भक्तासह इतर अनेक भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. आकर्षक रंगरंगोटी करून मंदिर  सजवण्यात आले होते. 
     








Post a Comment

0 Comments