मावळ जनसंवाद :-
कडधे ग्रामदैवत उत्सव निमित्त भरवलेल्या आखाड्यात यावर्षी मुलींनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागला पुरुष पाहिलवानांनी असमर्थता दाखवल्याने कडधे गावचा आखाडा हा एक पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी माघ पौर्णिमेला कडधेतील विविध ग्रामदेवतांचा उत्सव साजरा झाला. यावर्षी अखंड हरिनामाचा सप्ताह तब्बल सोळा दिवस भजन,कीर्तन,पारायण अशा विविध उपक्रमांनी संपन्न झाला.हभप निवृत्ती महाराज देशमुख हे या प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होते. निवृत्ती महाराजांच्या प्रबोधनात्मक किर्तनाच्या वेळी तालुका भरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली. त्या वेळी कडधे परिसर हरिनामाने व निवृत्ती महाराजांच्या किर्तनाने दुमदुमून गेला.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी जय मल्हार कला नाट्य मंडळ, कोरेगाव बु. यांचा रक्तात न्हाहली प्रित अर्थात येळकोट येळकोट जय मल्हार या वगनाट्याने रसिक प्रेक्षकांची मने हेलावून टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी दोन बायका फजिती ऐका या वगनाट्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अशाप्रकारे भारुडाच्या माध्यमातून मनोरंजनातून सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षीप्रमाणे जंगी मैदानी कुस्त्यांच्या आखाडा भरला होता.
यावेळी देखील मावळ तालुक्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतुन पहिलवान तसेच कुस्तीशौकीनांनी हजेरी लावली होती. दरम्यान कुस्तीसाठी मुलांना आव्हान देणाऱ्या पहिलवान मुलीच आकर्षणाचा भाग ठरल्या. तळेगावची पै.सांचू मोहिते, कान्हे गावची पै.सायली सातकर व भडवली येथील पै.विशाखा अनिल लोहोर या तिनही मुली पैलवान मावळातीलच असल्याने उपस्थित मावळवासियांनी तिघींचेही तोंडभरून कौतुक केले. विशेष म्हणजे मुलींकडून कुस्ती हरलो तर? या धास्तीने युवक पाहिलवानांनी असमर्थता दर्शवल्याने दोन पहिलवान मुलींना जोडच मिळाला नाही त्यामुळे विशाखा व सावरी या दोघींमध्येच कुस्ती लावण्यात आली. एकाचढ एक डावांनी कुत्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बराच वेळ चाललेल्या या कुस्तीला अखेर पंचांनी बरोबरीने सोडविण्याचा निर्णय घेतला. याबराच वेळ चाललेल्या या आखाड्यात कडधे येथील पै. साहिल सुरेश शेळके, शिवली येथील पै.अतिश रामदास आडकर व कुंभेरी येथील पै. विशाल दाभाडे या तिघांनाही चांदीची गधा पटकविण्यात यश आले. कडधे उत्सव कमिटी, ग्रामस्थ व कुस्ती शौकिनांनी उपस्थित पहिलवान मुलींच्या साहस व खिळाडूवृत्तीला सलाम ठोकत भरगोस बक्षिसांनी दाद दिली. सिने अभिनेता व दिग्दर्शक आमिर खानने हरियाणाच्या संगीता फोगट व भगिनींवर दंगल सिनेमा काढल्या भारतात मुलींच्या कुस्तीसाठी पालकांचा प्रतिसाद वाढत आहे. एकप्रकारे कुस्तीतील पुरुषांचे वर्चस्व मुली मोडित काढत असून भविष्यात पालकांकडून मुलींना कुस्तीसाठी प्रोत्साहन भेटून पहिलवान मुलींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदर आखाड्याच्या मैदानात पंच म्हणून नारायण भोकरे, संजय केदारी, भाऊ तुपे, गणपतराव घरदाळे, रामदास मोहोळ, जमिर शेख व गोरख खराडे यांनी काम पाहिले.
0 Comments