Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

शालेय विद्यार्थ्यांच्या जिव टांगनीवर ..!


मावळ जनसंवाद :- 
               मावळ तालुक्यात काही इंग्लीश मिडीयम शाळा ह्या घरापासून लांब आहे.पालकांना आपल्या मुंलाच्या शाळेत जाण्या- येण्यासाठी खूप अडचण निर्माण होती. विशेता पावसाळ्यात विद्यार्थ्यांना चिखल तुडवत जावे लागत असल्याने तसेच मुंलाना महामार्ग ओला दंताना अतोनात हाल होतात. ह्या अनुषगाने याबाबत पालकांनी शाळेच्या प्राचार्यांकडे वारंवार तक्रार विचार विनिमय करून पालकांच्या घरी थेट दारापुढे शाळेची बस पाठवून ये जा करतात. त्या मुळे पालकांच्या खिशाला फटका बसला तरी पालकांचा वेळ वाचत आहे. शिवाय काही शाळा खेडेगावापासून ते शहरापासून लांब असल्याने पालकांना शाळेत असणार्‍या खासगी बस व इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी नेले जातात. अपघात झाल्यास या विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकते ही वस्तू स्थिती आहे.
       परंतु मावळ तालुक्यात काही शाळांच्या बस व इतर खासगी वाहनांवर अनेक मुले ही स्कूल बसने प्रवास करत असूनत्यासाठी महिनाकाठी मोठी रक्कम पालकांना मोजावी लागते. त्यानुसार सुविधा दिल्या जात नाहीत. तसेच बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मुलांना भरणा करून वाहतूक केली जात आहे. त्या कडे ना प्रशासनाचे ना वाहतूक पोलिसांचे लक्ष असते. 



           काही शाळा या शाळेच्या बस महामार्गावरून विरुद्ध दिशेने प्रवास करत असूनमहामार्गही विरुद्ध दिशेने ओलांडत असल्याने  काही ठिकाणी स्कूल बसमुळे विद्यार्थ्यांना या अपघाताचा मोठा धक्का बसला आहे. 
          कामशेत हद्दीतील जुना मुंबई-पुणे महामार्गाच्या विरुद्ध दिशेला डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेला गेली अनेक वर्षे रस्ता नसल्याने शाळेच्या बस व इतर खासगी बस महामार्गाच्या बाजूलाच उभ्या केल्या जात आहेत. तेथून पुढे विद्यार्थ्यांना शाळे पर्यंत पायी जावे लागत आहे. काही शाळा ह्या डोंगरावर असल्याने त्या ठिकाणी झाड झुडपांचे प्रमाण जास्त असते त्या ठिकाणी विचू काठा मोठ्या प्रमाणात असतो एका  विद्यार्थी यांच्या भोवती असाच प्रकार मावळ तालुक्यातील शाळेमध्ये घडला आहे. 
      मावळात काही वर्षांपासून इंग्रजी शाळांना महत्त्व आले असून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी स्वत:ची अशी सुविधा नाही. बहुतांशी शाळा खासगी बस व इतर वाहनांचा सर्रास वापर करत आहेत. अनेक शाळांच्या स्कूल बसची वाहतूक नियमांची पायमल्ली करीत धोकादायक पद्धतीने सुरू असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
           काही शाळा मध्ये विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचे अनेक नागरिक व पालक सांगत आहेत. शाळांमधील खासगी प्रवासी वाहतूक हा ऐरणीचा विषय बनला आहे. याकडे वाहतूक पोलीस व शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. 

Post a Comment

0 Comments