मावळ जनसंवाद :-
कामशेत मध्ये अमूल दूध संचलित रुद्र दूध संकलन केंद्रात म्हशीच्या दुधाला तब्बल चौऱ्यांशी रुपये भाव मिळाला आहे.मावळात सात ठिकाणी अश्या प्रकारचे दूध संकलन केंद्र आहेत.गाई-म्हशीच्या दुधाला जास्त भाव मिळत असल्याने दूध व्यवसाय हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी किफायतशीर ठरत आहे.
भूमिहीन मजूरवर्ग, शेतकरी मोठय़ा प्रमाणावर या व्यवसायाचा उपयोग करतात.तसेच शेतकर्यांच्या शेतीला सर्वाधिक उपयुक्त ठरणारा पूरक उद्योग किंवा जोडधंदा म्हणून मावळ तालुक्यातील शेतकरी बांधव मोठया प्रमाणात करतात.
कामशेतच्या संकलन केंद्रात म्हशीच्या दुधाला चौऱ्यांशी रुपये तर गाईच्या दुधाला ३६ रुपये प्रति लिटर भाव मिळाला आहे.संगणकीकृत दूध संकलन केंद्र असलेल्या ह्या केंद्रात फॅट,एस.एन.एफ दर लावलेल्या बोर्डावर दिसतो. दररोज शेतकऱ्यांना किती उत्त्पन्न मिळाले याची पावतीही लगेच दिली जाते.
याशिवाय मोबाईलवर मेसेज व डेअरीच्या aap वर नोंद होत असते. फॅट मोजण्यासाठी अत्याधुनिक व ऑनलाइन मशिन संगणकाला जोडलेली आहे. दूध मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा असल्याने पारदर्शक कामकाज होताना दिसतो. स्वच्छतेची काळजी घेत गाईच्या दुधाला किमान ३० रुपये तर म्हशीच्या दुधाला ४२ रुपये भाव दिला जातो.अधिकचा भाव नाणे गावातील नरेश धोत्रे या शेतकऱ्याला ८२, ८४ रुपये भाव मिळाला आहे.याशिवाय बाळकृष्ण शिंदे,नामदेव काटकर,दिलीप कोंढरे, कमलेश बालगुडे, शेखर खोंडे, विक्रम वाळुंज इत्यादी शेतकऱ्यांना मिळाला आहे.
हिरवा चारा,पशुखाद्य व कडबा कुट्टी योग्य प्रमाणात दिल्याने दूध उत्पादन चांगले मिळते.उत्पादन खर्च महागाईमुळे वाढला असला तर दुधाचा दर चांगला मिळत असल्याने दूध व्यवसाय फायदेशीर वाटू लागला आहे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
प्रतिक्रिया :- अमूल संचलित दूध संकलन केंद्र असल्याने दूध उत्पादकांना दुधाची फॅट योग्य तपासली जाते याची खात्री पटली आहे.याशिवाय दर दहा दिवसांनी दुधाचे बिल बँकेत जमा होत असल्याने कामात पारदर्शकता आहे. असे मत श्री. विजय शिवाजीराव टाकवे यांनी दिले. छायाचित्र :- अमूल दूध संचलित रुद्र दूध संकलन केंद्र व शेतकरी यांच्या समोहत कामशेत येथे
ठिपलेला फोटो
1 Comments
Malahi dugdh vyavsay karaycha aahe tyasathi loan aani subsidy milel ka?
ReplyDeleteMazyakade krushi padvika aahe.