मावळ जनसंवाद :-
तमिळनाडू (तीरुनवेल्ली) येथे २८ ते ३० डिसेंबर रोजी झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापिठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये तळेगाव दाभाडे येथील चेतना दिपक घोजगे हिने ४९ किलो वजनी गटामध्ये स्नच ७० किलो व क्लिन जर्क ९० किलो असे एकूण १६० किलो वजन उचलून रौप्य पदावर आपले नाव कोरले. वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुल येथे बिहारीलाल दुबे व आनंद जांभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असून तळेगाव मधील इंद्रायणी महाविद्यालया मध्ये वाणीज्य मास्टर दिव्तीय वर्षामध्ये शिकत आहे.
या स्पर्धेतून २ फेब्रुवारीला होणारी जेष्ठ राष्टीय स्पर्धा खेलो इंडिया या स्पर्धेसाठी निवड झाल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. त्याच प्रमाणे सारिका शिनगारे ४५ किलो वजनगटामध्ये कास्य पदक मिळवले व रुचिका ढोरे ही सुद्या पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत होती.
छायाचित्र :- चेतना दिपक घोजगे यांनी रौप्य पदक परिधान केलेला फोटो

0 Comments