Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नागरिकांना फटका बेजबाबदार कार्यप्रणालीचा ...!

मावळ जनसंवाद :-
       
                  मावळ तालुक्यातील दुर्गम भाग किंवा दूरवरच्या वाड्या -वस्त्यांमधून येणाऱ्या नागरिक शेतकऱ्यांना तहसीलदार कर्यालयामधील कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कार्यप्रणालीचा फटका बसत आहे. तहसील  कार्यालय मधील अधिकारी कामगार वर्ग तासनतास व्हॉट अप, फेसबुकला प्राधान्य देताना अनेकदा दिसतात.
                प्रशासनाचा कर्मचारी,अधिकाऱ्यांवर धाकच राहिला नसल्याने नागरिक सांगतात. मागील काही वर्षापूर्वी तहसीलदार जोगेंद्र कठ्यारे यांनी खाजगी कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले होते. ते आता पुन्हा खाजगी व्यक्ती तहसील कार्यालयामध्ये ही फाईल उचल तो पेपर आण ह्या अधिकार्याकडे जा असे चित्र पहावयास मिळते.
           तसेच  तहसील कार्यालयातील आवक जावक विभागातील खाजगी व्यक्ती  ही शासकीय  कागदपत्रे उलथा पालथ करीत असून  चक्क  एखादे  पेपर तहसील कार्यालयात देता वेळेस पोच म्हणून खाजगी व्यक्ती त्या पेपरवर स्वतःची सही केली जाते.तसेच महिना महिना पेपर हे आवक जावक कार्यालयामध्ये तसेच पडले जाते. त्या कडे ना तहसीदार ना अधिकारी लक्ष्य देण्यास तयार नाही असा आरोप नागरिक करीत आहे. 



 
  छायाचित्र :-  तहसील कार्यालयातील आवक जावक विभागातील खाजगी व्यक्ती  ही  शासकीय कागदपत्रे उलथा पालथ करीत असताना येथे टिपलेला फोटो



     छायाचित्र :-  तहसील कार्यालयातील आवक जावक विभागातील शासकीय कर्मचारी नसताना  टिपलेला फोटो
                        ठराविक प्रमाणिक अधिकारी,कर्मचा-यांवर कामाचा बोजा आहे. तरीदेखील आपले प्रमाणिक काम हे नियमित करतात. तहसील विभागातील सर्वच विभागांत बेजबाबदारपणे कारभार सुरु असल्याचे कामानिमित्त आलेले अनेक नागरिक सांगतात. नागरिकांना  असा प्रश्न पडत नसावा कि आहे अधिकारी जातात तरी कोठे ?
            तहसील कार्यालय मध्ये  खरच ठराविक प्रामाणिक अधिकारी अव्वल अधिकारी वरती कामाचा  बोजा  आहे. तरिसुद्या  ते प्रामाणिक काम करतात. त्याकडे कोणाचे हि लक्ष नाही. ते प्रमाणिक अधिकारी कोणाकडे व्यथा  मांडत  नाही. प्रशाशनाने जास्त जास्त कोतवाल पद  भरण्यात यावे. जेणेकरून खाजगी कामगार वर्ग ठेवणाची वेळ येणार नाही. 
                  शिवाय ह्या  व्यक्ती व्यतिरीक्त अन्य विभागातील खात्यात सुद्धा अशी अंदा धुंदीची कामे चालतात अशी प्रतिक्रिया  कामानिमित्त  त्या ठिकाणी आलेल्या  नागरिकांनी दिली आहे. तहसील कार्यालयातील सर्वच विभागांतील कारभार लोकाभिमुख आणि सुव्यवस्तीत चालण्यासाठी तहसीलदार आणि  प्रशासनाने लक्ष्य घालावे.अशी मागणी होत आहे. 

           



                      




Post a Comment

0 Comments