Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

अंगणवाडीतील मुलांची परिसर सहल उत्साहात..!

मावळ जनसंवाद :-
       
             मावळ तालुक्यात ३ जानेवारी ते १२ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती सप्ताह निमित आयसीडीएस प्रकल्प सर्व अंगणवाडी केंद्रात रोज वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. नाणे मावळातील केंद्र नेसावे, खांडशी, वेल्हवळी,सांगिसे, बुधवडी, वळक, व वाडिवळे या सर्व अंगणवाडीतील मुलांची परिसर महादेव मंदिर वडीवळे येथे सहल आयोजित करण्यात आलेली होती.
          त्यानिमित्ताने परीसर सहलीमध्ये विविध खेळ, क्षेत्र भेट ,मंदिर भेट व भोजनाचे आयोजन करण्यात आले. विशेषता करून लहान मुलांचा आनंद तर गगनात मावेनासा होता.मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. 
          यावेळी खडकाळा बिट सुपरवायझर कविता चव्हाण,अनिता कुटे,अंगणवाडी सेविका व मदतनीस व सर्व मुलं व पालकांनी सहलीचा आनंद लुटला.
          

                    




छायाचित्र :-  परिसर सहलीचा आनंद घेतलेली मुलं व आयोजक यांचा वडिवळे येथे टिपलेला फोटो

       

Post a Comment

0 Comments