मावळ जनसंवाद :-
मावळ तालुक्यामध्ये पांदण तसेच गाव
अंतर्गत रस्त्यांचे अस्तित्व उरले फक्त
कागदावरच प्रत्येक्ष मात्र नकाशावर रस्ते आहेत. काही गावामध्ये मात्र हे पांदण रस्ते, गाव अंतर्गत नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बहुतांशी पांदण
रस्त्यावर अतिक्रमण मोठया प्रमानात स्थानिक व्यक्तीनी अथवा शहरातील बिल्डर यांनी केले आहेत. या रस्त्यावर जमिनदार व स्थानिक व्यक्तीनी अतिक्रमण केल्यामुळे जुन्या पाऊलखुणा नष्ट होताना दिसत
आहे.
मावळ तालुक्यामधे जमिनीना सध्या सोन्याचा भाव आला
आहे.पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग,पुणे-मुंबई दुरतगती मार्ग,मावळातुन गेलेला आहे.त्यामुळे बिल्ल्डर यांनी बांधकाम व्यावसायिक ,व्यापारी आदिना मावळाचे आकर्षण वाढले.त्यामुळे या लोकांनी मावळामधे
गुंतवणूक वाढवली.अनेकांनी मावळामधे जमिनी विकत घेऊन उद्योग व्यवसाय, तसेच
धरणा शेजारी रोहाऊस, बंगले बांधले आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठया शहरांच्या मध्यावर मावळ
तालुका असल्यामुळे या तालुक्याला वेगळे महत्त्व आहे.
खेडे गावामध्ये अथवा गावोगावी जुन्या पाऊलवाटा तसेच पांदण तसेच गाव
अंतर्गत रस्ते आता दिसेनास्या झाल्या आहेत .या
पाऊलवाटांचा, पांदण तसेच गाव अंतर्गत रस्त्यांचा उपयोग शेतकरी शेतातील औजारे,बैल, जनावरे,महिला वर्ग पाणी अन्याच्या, शेती उपयोगी साहित्य ने-आण करण्यासाठी करीत असत.परंतु
बिल्ल्डर यांनी खरेदी केलेल्या जमिनींमुळे जुन्या
पाऊलवाटा दिसेनास्या झाल्या आहेत.जागोजागी तारेची कुंपणे झाली असुन ,सिमेंटच्या पत्र्यांच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत.कुंपणे करण्यासाठी विनापरवाना
वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे.त्यामुळे जंगलांचा -हास होत आहे .वाढत्या
सिमेंटच्या जंगलांमुळे पशू-पछांच्या दैनंदिन जिवनावर देखील परिणाम होऊ लागला आहे
.त्यांचे स्वातंत्र्यच हिरावून घेतले आहे .जुन्या पाऊलवाटा/ पांदण तसेच गाव अंतर्गत रस्त्यांमुळे शेतकरी जलद स्वतःच्या शेतामधे कामासाठी
पोहोचत असत.परंतु आता त्यांना समोरच आपल्या शेतामधे जाण्यासाठी बिल्डरणे घेतलेल्या
जमिनीला अथवा जागेला वळसा घालून जावे लागते.
खेडे गावामध्ये सरकारी पांदण रस्त्यावर देखील बिल्ल्डर यांनी व स्थानिक
व्याक्तीने संगनमताने अतिक्रमण केले आहे.विस ते
तिस फुटी असणारे पांदण रस्ते आता फक्त नकाशावरच उरलेले आहेत खेडे गावामध्ये काही जमिनदारांनी जमिनी खरेदी केल्या असुन सरकारी
खात्याची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता रस्ते बनविले आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक व्यक्तींच्या मदतीने सरकारी पांदण रस्ते गिळंकृत केलेले आहे.कुठलीही परवानगी न घेता डागडुजी
करुन रस्ते बनविले आहेत.काही ठिकाणी सरकारी पांदण रस्ते १५ ते २० फूट रुंदीचे आहेत, त्या ठिकाणी स्थानिकांनी अतिक्रमणे केली असुन रस्ता फक्त
चार ते पाच फुटच फक्त उरला आहे.तसेच गाव पांदण वरती झाडे लावून हि अतिक्रमण केले
आहे.
अशा रस्त्यांवर अतिक्रमण करणारे मोठे
जमिनदार व बिल्डर असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत
नाही.त्याच्या दहशतीमुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत
नाही.ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये देखील बांधकाम व्यावसायिकांनी तसेच बिल्डर यांनी
शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन मोठया प्रमानात पोल्टिंग केला असुन भागाचे शहरीकरण होत आहे.जागोजागी सिमेंटची
जंगले उभी राहत असुन कुठलीही परवानगी न घेता स्थानिक व्यक्ती व त्या खात्यातीला अधिकाऱ्यांच्या संगनमताने डोंगरांचे
उत्खनन करण्यात आले आहे.त्या ठिकाणी उंच अशा कडावर वर बंगले बांधले आहे त्या साठी
डोंगर / टेकडी यांचे उत्खनन करून राञंदिवस माती अथवा मुरुमाची चोरी होती त्याकडे ना प्रशासन पाहण्यास तयार नाही.
डोंगरांचे उत्खनन करताना मोठ्या झाडाची कत्तल केली जाते.
मावळामधे जमिनीना सोन्याचे भाव आल्यामुळे खाजगी एजंटामार्फत शेतकरी जमिनी विकत
आहेत.परंतु जे जमिनी न विकणारे शेतकरी आहेत.त्यांना माञ नाहक या बिल्ल्डर यांनी ञास सहन करावा लागतो.एजंट माञ जमिनी विकण्यास भाग पाडुन
स्वतः ची पोळी भाजुन घेत आहेत.
जागोजागी झालेले तारेचे कुंपण
आतिक्रमण झालेले पांदण रस्ते यामुळे गरीब शेतकरी झाले असुन आतिक्रमण ज्यांनी केले त्यांच्यावर कारवाई कोण करणार? कधी करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शिवाय गाव पांदण स्थनिक व्यक्तीने /तसेच बिल्डरने
पोल्टिंग केल्यामुळे शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी गावाला वळसा
घालावा लागतो. याकडे प्रशाशनाने तात्काळ पांदण तसेच गाव अंतर्गत रस्ते जाण्यासाठी खुले करावे.तसेच धरणाशेजारी, धरण क्षेत्रात अतिक्रमण करून बांधलेले बंगले, रोहाऊस, ह्यावर कारवाई करावी अशी
मागणी नागरिक करीत आहे.
0 Comments