मावळ जनसंवाद :-
मावळातील उद्योजक पै.देविदास अनंता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त (माघ शु.अष्टमी.दि.२ फेब्रुवारी) या दिवशी मावळ तालुक्यातील पाच हजार (५०००) महिलांसाठी मोफत त्र्यंबकेश्वर दर्शन या यात्रचे आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी वाढदिवसाचे औचित्य साधुन तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मावळ तालुक्यातील दोन हजार (२०००) महीलांना सन २०१८ मध्ये मोफत महालक्ष्मी दर्शन (कोल्हापूर) याञा घडविण्यात आले. तसेच सन २०१९ मध्ये मागील वर्षी साईबाबा दर्शन (शिर्डी) या यात्रेला पाच हजार (५०००) महीलांनी सह्भाग घेतला होता. तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले होते. अशा सामाजिक उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.
त्र्यंबकेश्वर यात्रेस दि.२ रोजी कामशेत (नायगाव)येथील हिरकणी लॉन्स रिसोर्ट येथून सकाळी साडे आठ वाजता त्र्यंबकेश्वर यात्रेचे प्रस्थान होणार आहे.त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी शंभर बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेत सहभागी होण्याऱ्या महीलांना चहा, अल्पोपहार व भोजन मोफत उप्लब्ध करून देण्यात येणार आहे. असल्याची माहिती पै.देवाभाऊ गायकवाड मित्र परिवार व संयोजकांनी दिली.
0 Comments