मावळ जनसंवाद :-
पठारावर हा धनगर समाज गाई, म्हशी, शेळी पालन व काही प्रमाणात शेती व मोलमजुरी करून उपजिविका करत आहे येथे वीज नसल्याने येथील मुलांना दिव्याखाली अभ्यास करावा लागतो तर रस्ता नसल्याने दवाखान्यात जाण्यासाठी मार्ग नसल्याने घरगुती औषधोपचार करावे लागतात रूग्णांना दवाखान्यात नेणे कठीण असते- डोंगर चढून व उतरून प्रवास करावा लागतो या त्र्याहत्तर वर्षां पासून येथील समाजाला मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे
नाणे या भागात साई,करंजगाव, कोंडीवडे या गावांच्या पठारावर पवनचक्की असुन वीज बाहेर पाठविली जाते पण येथील स्थानिक लोकांना वीजेच्या सुविधा पासून वंचित राहवे लागते हि वस्तू स्थिती असून हे येथील स्थानिक लोकांचे दुर्दैव आहे.
तसेच येथे ही वीज निर्माण करणारी कंपनी आपल्या शेजारी असुन देखील फायदा होत नाही. ज्या पठारावर ह्या कंपनीचा कच्चा रस्ता आहे पण ह्या कंपपीने जर नव्याने रस्ता तयार केला तर त्याचा फायदा येथील लोकांना होऊ शकतो पण कंपनी व येथील राजकीय अनास्था यांच्यामुळे रस्ता होऊ शकला नाही.
नाणे मावळातील पठारी भाग आहे. ह्यामध्ये उकसान पठार करंजगाव पठार, शिरदे पठार नाणे पठार वडेश्वर पठार कुसूर पठार करंजगाव पठार संपुर्ण भाग येथील जवळपासच्या ग्रामपंचायत मध्ये विभागला आहे. जर ग्रामपंचायतीने एखादा ठराव घेतला कंपनी कडुन कर घेवु शकतो. पण कर कोण ठरवणार असा प्रश्न उपस्थीत होत आहे.
0 Comments