Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

थंडी मुळे मावळ तालुका गारटला...!

मावळ जनसंवाद :-  
              मावळ तालुका थंडीने गारठला असुन चार दिवसापासून थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे .सकाळी असणारे धुके आणि थंडी या मुळे येथील ग्रामीण भागात जन जीवनावर थंडीचा मोठा परिनाम होत आहे.  सकाळी कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाला थंडीपुढे सामोरे जावे लागत आहे.धुक्यातून वाट काढत व थंडीला सहन करत कामावर जात आहे शाळामहाविध्यालय मध्ये जाणाऱ्या विध्यार्थाना थंडीत जावे लागत आल्याने ग्रामीन भागतील विध्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे.लहान मुले शाळेत जाण्यास कंटाळतात.                                                              दोन दिवस शनिवार रविवार ह्या दिवशी सुट्टी असल्यामुळे सर्वांनी थंडीमुळे सकाळी घरी राहणे थंडी पसंद केले. स्वेटर ची जागा मात्र जर्किंने घेतली असुन लहानापासून ते मोठ्या माणसापर्यंत जर्किन चा वापर होत आहे. सकाळी सकाळी उन् पडल्या शिवाय कामाला सुरवात होत नसल्याचे जाणवते .तसेच थंडी बरोबर दिवसभर वाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. त्त्यामुळे हवेत दिवसभर गारवा असतो परत संध्याकाळ होताच पुन्हा थंडी वाढू लागते. या थंडी मुळे मावळात (गावागावात) रस्त्याच्या तसेच मंदीरा शेजारी शेकोटी पेटवल्याली पाह्याला मिळतात शेकोट्या भोवती विविध चर्चेचे विषेय रंगत आहे. पण ह्या वाढत्या थंडीचा परिणाम आरोग्यावर होउ लागला आहे सर्दी थडी ताप या रुग्णामध्ये वाढ झाली आहे. 
          प्रामुख्याने लहान मुले जास्त आजारी दिसून येते पण या थंडीचा शेती वर कोणताही वाईट परिणाम होत नसून उलट हर वातावरण शेतीस उपयुक्त असल्याचे शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे.शिवाय पिके हरभरावाटानागहु मका जोमात वाढताना दिसत आहे.      



              छायाचित्र :- हिवाळ्या या महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते.थंडीपासून सरक्षण  होण्यासाठी तसेच बच्चे कंपनी शेकोटीचा आंनद घेत असता वेळेस कोंडीवडे ना.मा गावामध्ये परिसरात ठिपलेला  फोटो  

Post a Comment

0 Comments