मावळ जनसंवाद :-
मावळ तालुका हा भात पिकास अग्रेसर असून त्याच बरोबर हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु मावळ तालुक्यात शेतकरी बांधवावर ओल्या, कोरड्या दुष्काळाचे संकट असताना पुन्हा एकदा शेतकरी बांधवापुढे ऊस तोडणीला उशीर होत असल्याचे संकट उभे राहिले. माघ महिना सुरु झाला असला तरी शेतकरी बांधवांचा ऊस ह्या पिकाची तोड झाली नाही. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी नोहेंबर पासूनच ऊस तोड करून ऊस कारखान्याला नेला जातो. काही ठिकाणी ऊस तोड चालू आहे परंतु काही ठिकाणी ऊस तोड बंद आहे ही वस्तू स्थिती आहे.
काही भागात ऊस ह्या पिकाची साखर कारखान्यांनी वेळेत तोड करण्यास सुरवात न केल्यामुळे ऊसाला तुरे लागले आहेच त्याच बरोबर ऊसाचे वजन कमी होत चालले आहे. या वर्षी पाऊस चांगला पडून व पिक चांगले येवून सुध्या वेळेत ऊस तोडणी होत नसल्याने शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ लागले आहे.
त्यामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त होत असून ऊस तोडणी लवकरात सूरु करण्यात यावी. जेणेकरून शेतीची मशागत करण्यास वेळ मिळेल अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे.
0 Comments