Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

कान्हे- नायगावच्या उपसरपंच पदी गिरीश सातकर यांची बिनविरोध निवड..!

मावळ जनसंवाद :-  
                         ग्रुप ग्रामपंचायत कान्हे- नायगावच्या उपसरपंच पदी शिवसेनेचे  गिरीश उत्तमराव सातकर यांची  बिनविरोध  निवड झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या कान्हे  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी  विजय सातकर हे निवडून आले होते. पाहिल्या कमिटीची मुदत संपली असल्यामुळे त्यामुळे नूतन सरपंच विजय  सातकर यांच्या अध्यक्षते खाली उपसरपंच पदासाठी निवडणूक  घेण्यात आली.  
           शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गिरीश उत्तमराव सातकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद खोमणे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नवनिर्वाचित उपसरपंच सातकर यांचा येवलेवाडी ग्रामस्थानांच्या वतीने सत्कार करण्यात आला . त्यावेळी युवा उद्योजक सोपान येवले, शिवसेना उपतालुका प्रमुख मदन शेडगे, शाखा प्रमुख शांताराम येवले, शरद शिंदे, उपविभाग प्रमुख कांताराम येवले, पप्पू येवले, संतोष चिखले, विठठल येवले आदी मान्यवर उपस्थित होते. 
                     
                                                                                                                

                       
   छायाचित्र :- ग्रुप ग्रामपंचायत कान्हे- नायगावच्या उपसरपंच गिरीश उत्तमराव सातकर यांचा येवलेवाडी ग्रामस्थानांच्या  वतीने सत्कार करताना ठिपलेला फोटो. 

Post a Comment

0 Comments