Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकरी बांधवांचे होतय नुकसान...!

  मावळ जनसंवाद :-  
            नाणे मावळातील गावांमधील इतर वाड्या वस्त्यामध्ये विधूत समस्या मोठ्या प्रमाणात असून महावितरण या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. या दुर्लक्षा मुळे शेतकरी बांधवांना विनाकारण नुकसान सोसावे लागते. तसेच काही ठिकाणी लाईटचे पोल हे वाकलेले आहेत. तसेच काही गावात मध्ये विधूत डीपी उघड्या आहेत.शिवाय दिवसातून दहा वेळा विधूत पुरवता खंडित होतो. याकडे महावितरण लक्ष्य अथवा चौकशी सुद्धा करीत नाही. या प्रकारचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. 
         नाणे मावळ परिसरात गेल्या महिन्याभरापासून विजेची ये-जा सुरु असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत असून विधुत पुरवता ये जा मुळे त्यांची नाराजी मोठया प्रमाणात वाढते महावितरणाचे कर्मच्यारी गावामध्ये आल्यावर गावात कोणत्या प्रकारच्या विधुत समस्या आहे का नाही हे का पाहत नाही. शिवाय वेळेवर वीज बिल  येत नाही  विनाकारण  दुसऱ्या महिन्यात दंड भरावा लागतो असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. 
          काही ठिकाणी विधुत तारा लोमकळत असून त्या एकमेकांना वाऱ्या मुळे स्पर्श होतात.शिवाय आजूबाजूला झाडे असल्यामुळे झाडांच्या फांद्या त्या विधुत तारा वर पडलेल्या आहे. स्पर्श झाल्यामुळे विधुत पुरवता खंडित होतो. या समस्या मुळे नागरिकांना विनाकारण अंधारात राहावे लागते. नाणे मावळातील गावा गावामधील लाईट चे पोल हे वाकलेले आहेत.परंतु तारेचे अंतर हे सुद्धा कमी आहे हि वस्तू स्थिती आहे. 
        विधुत वाहिनीच्या ताऱ्या चक्क खाली लोमकळत पडलेल्या अवस्थेत असून महावितरण ह्या कडे कोणत्याच प्रकारची दखल घेत नाही.  विधुत तारा लोमकळत असून त्या एकमेकांना वाऱ्या मुळे स्पर्श झाल्यास त्या ठिकाणी विधुत ठिगळया पडतात विधुत वाहिनीच्या ताऱ्याखाली काही शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा, ऊसज्वारी ,बाजरी. मका, आंबे, चिकू अन्य पिके व फळांची झाडे आहे. नाणे मावळ परिसरात असून भविष्यात  एखादी तार पडळ्यास शेतकऱ्यांचे कधीही भरून न होणारे नुकसान  झाल्यास  त्याला जबाबदार  कोण असे मत नागरिक व्यक्त  करतात.

       प्रशाषन ह्या कडे कोणतेच प्रकारची दखल घेत नाहीमहावितरनचे अधिकारी अथवा कर्मचारी वारंवार सांगून लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार दाखल करूनही कोणत्याही प्रकारची दक्षता व त्यावर ठोस निर्णय घेत नाही. विधूत समस्या संदर्भात वारंवार सांगूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. अशी तक्रार नाणे  मावळतील गावातील ग्रामस्थ करीत आहे.  
       

 छायाचित्र :-  नाणे मावळातील पाले ना.मा  येथे भेगडे फार्म हाऊस  या ठिकाणी वाकलेले    पोल व विधुत तारांचे अंतर जवळ असताना  ठिपलेला फोटो

Post a Comment

0 Comments