मावळ जनसंवाद :-
गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालय, करंजगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यानमालेत व्याख्याते गोरख बांगर बोलत होते.
छायाचित्र :-गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालय, करंजगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यानमालेचा टिपलेला फोटो
त्यावेळी प्रथम कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ व विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.कार्यक्रम स्थळाचे एकंदरीत वातावरण शिवमय झाले होते.मान्यवरांच्या स्वागत समारंभानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.त्यावेळी व्याख्याते गोरख बांगर यांनी जिजाऊ-शिवरायांचा सत्य इतिहास उलगडला..
त्यावेळी शिवरायांचा निर्व्यसनीपणा,प्रयत्नवाद,परा क्रम,मावळ्यांची निष्ठा,जिजाऊं चाकणखरपणाअसे शिवचरित्राचे अनेक पैलू सांगितले.
यावेळी विचारपीठावर वक्ते प्रा.सोमनाथ गोडसे, विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री.बी,बी नवले ,ज्येष्ठ शिक्षक एस.आर.धावणे,एस.ई.राळे,डी.एन,महाजन,अ.के.सातकर,डी.एस.टाकवे,अ.बी.वाडेकर,डी.डी.सातकर,व्ही.डी.केदारी यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाडेकर सर यांनी तर आभार मुख्याद्यापक श्री.बी,बी नवले सर यांनी मानले.
0 Comments