मावळ जनसंवाद :-
ग्रुप ग्रामपंचायत कांब्रे-कोंडीवडेच्या (ना.मा) सरपंचपदी सौ.करुणा कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.माजी सरपंच भाऊसाहेब दाभणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली .निवडणूक अधिकारी म्हणून एस.व्ही.खोमणे , यु.एस.दुधाणे ग्रामसेवक जे.एस.तांबे यांनी काम पाहिले.
सरपंच पदाच्या निवडीसाठी सौ.करुणा गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे त्या कांब्रे-गावातील गायकवाड परिवारातील पहिल्या महिला सरपंच ठरल्या. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, माजी सरपंच साईनाथ गायकवाड,भाऊसाहेब दाभणे,अंकुश गायकवाड, नथु गायकवाड,बाळासाहेब पऱ्हाड ,पोलिस पाटील भारती गायकवाड , सोमनाथ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नंदा गायकवाड, लक्ष्मी पऱ्हाड, संगिता गायकवाड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ.गायकवाड यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विविध प्रकारची विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कांब्रे-कोंडीवडेच्या सरपंचपदी सौ.गायकवाड यांची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सत्कार करताना माजी सरपंच साईनाथ गायकवाड व भाऊसाहेब दाभणे.आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments