Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

महावितरणाचा अजब कारभार - शेती करंजगावात तर ट्रान्सफॉर्मर बुधवडी व सांगिसे गावात...!

मावळ जनसंवाद :-
       
       नाणे मावळातील करंजगावच्या शेतकऱ्यांची पिके ही विजेच्या अनियमिततेमुळे धोक्यात आली आहे.वडीवळे धरणामुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या जोरावर या भागात ऊसाचे व इतर पिकांचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. महावितरणाच्या दुर्लक्षित कारभारामुळे येथील शेतकऱ्यांची धरण उशाला अन् कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या कडे महावितरण अजिबात लक्ष्य देण्यास तयार नाही.
             पौष ह्या महिन्यात शेतकरी बांधव ऊस ह्या पिकाची लागवड करतात.आजच्या स्थितिला करंजगाव ह्या ठिकाणी शेतकरी बांधव ऊस लागवड करीतआहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे विधूत पुरवता वारंवार खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांच्या पाण्याचे विधूत पंप अनेक दिवसांपासून बंदच राहत आहेत. दिवसभर येथील शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे.शिवाय पाण्याअभावी पिके धोक्यात आली आहेत.ऊस लागवड रखडलेल्या अवस्थेत असून ऊसाचे बियाणे वाळू लागले आहे.
     करंजगावच्या भागातील शेतकऱ्यांना बुधवडी गावातील ट्रान्सफॉर्मर मधून विजेचा पुरवठा करण्यात येत आहे.परंतु शेतकऱ्यांची संख्या पाहता तो उपाय तुटपुंज्या स्वरूपाचा ठरत आहे.
           शेती करंजगावात तर ट्रान्सफॉर्मर बुधवडी व सांगिसे गावात असल्यामुळे शेतकरी बांधवाचे पाण्याचे विधूत पंप सुरु झाल्यास ट्रान्सफॉर्मरवर ताण निर्माण होतो व ट्रान्सफॉर्मरचे  फ्युज जातात.त्यामुळे पाण्याचे विधूत पंप बंद पडतात.
          पाण्याचे विधूत पंप बंद पडल्यामुळे शेतकरी बांधवांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.ह्या कडे महावितरण लक्ष्य देण्यास तयार नाही.  शेतकरी बांधवांचे होत असलेली नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न  नागरिकांना पडत आहे.
        वर्षभरापासून हा प्रश्न प्रलंबित असतानाही देखील महावितरण विभागाने तात्काळ करंजगावच्या भागातील शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा.अशी मागणी राजेश शिवाजी टाकवे ,संजय टाकवे, सुनिल टाकवे,अनिल माझिरे, भाऊसाहेब मोरमारे ,मंगेश मोरमारे,नानासाहेब साबळे,संजय भुरुक यांनी केली आहे.


          छायाचित्र :-  करंजगाव -ऊस लागवड रखडलेल्या अवस्थेत असताना टिपलेला फोटो

Post a Comment

0 Comments