मावळ जनसंवाद :-
कामशेत - जांभवली या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणात झाडे - झुडपे रस्त्यावर आलेली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले. ह्या रस्यावरून गावातील दूध व्यवसायिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग,पर्यटक मोठया प्रमाणात प्रवास करतात. नाणे मावळातील नागरिकांना तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी ह्याच रास्त्याचा वापर केला जातो.
नाणे मावळमध्ये धाक बहिरी, कोंडेश्वर ही देवस्थान प्रचलित आहे. तसेच नदया,नाले, धरण, डोंगर, पर्वत, दऱ्या, कडे कपारी मोठया प्रमाणात असल्यामुळे पर्यटक ये - जा करतात. त्यामुळे नाणे मावळात मोठया प्रमाणात वाहनांची व माणसांची वर्दळ असते.
छायाचित्र :- कांब्रे ना.मा येथे टिपलेला फोटो
रस्त्यावर आलेल्या झाडे - झुडपे मुळे समोरची ये -जा करणारी वाहने दिसत नाही. त्यामुळे अपघात मोठया प्रमाणात होतात. ह्या कडे स्थानिक प्रतिनिधी व शासकीय कर्मचारी लक्ष देत नाही असा आरोप नाणे मावळातील नागरिक करीत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही मोठया प्रमाणात प्रवास करणे शक्य होत नाही. प्रवास करताना अडथळा येतो. शिवाय जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात.
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडे - झुडपा पासून सुटका कधी होणार असा सवाल परिसरातील संतप्त नागरिक प्रशासनाला करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नाणे मावळातील रस्त्याच्या कडेला आलेली झाडे - झुडपे लवकरात लवकर तोडण्यात यावी.अशी नागरिकांची मागणी आहे.
0 Comments